- फार वर्षांपूर्वी काही शास्त्रज्ञांनी ⚗ एक प्रयोग करायचा ठरवला.
- त्यासाठी त्यांनी ५० माकडे 🙊 पकडून आणली की जी सर्व एकाच जातीची आणि एकाच ठिकाणची होती.
- त्या सर्वांना एका मोठ्या गार्डनमध्ये 🌿 ठेवले.
- त्या गार्डनच्या बाहेर (खूप दूर) एक प्रयोग शाळा 🚸 बांधली. त्याचीही रचना गार्डन सारखी केली. पण काही बदल केले.
- त्या प्रयोग शाळेच्या मध्ये एक शिडी लावली.
- शिडीवरी केळे 🍌 अडकवले की जी त्या सर्व माकडांचे आवडते खाद्य पदार्थ होता.
- प्रयोगाचा पहिला दिवस 🌃 उजाडला त्या दिवशी शास्त्रज्ञांनी त्या पकडलेल्या ५० माकडा पैकी १० माकडांना त्यांच्या गार्डनमधून काढून प्रयोग शाळेत टाकले.
- पाहिल्या दिवशी त्ये फार घाबरलेले होते कारण ती जागा त्यांच्या साठी नवीन होती. पण धोक्याची कोणतीच चाहूल नाही लागल्याने त्यांना मस्त वाटू लागले. दुपारी त्यांना भूक लागली त्याच्या शोधात ते भटकू लागले. शास्त्रज्ञांनी खाण्यासाठी काही पदार्थ टाकले होते. त्यामुळे त्यांचे पोट भरले. मग ते मनोरंजनासाठी फिरू लागले. सायंकाळी त्यातील काही माकडांचे लक्ष त्या शिडी कडे गेले त्याच बरोबर त्यांना शिडीच्या वर गेले आणि ते धावत सुटले. त्यातील एक माकड सर्वात अगोदर वर चढले आणि त्याने केळी घेण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळी त्या संपूर्ण गार्डन मध्ये अतिशय गरम पाण्याचा वर्षाव झाला आणि त्या मध्ये सर्व माकडांची चामडी सोलून निघाली. वरी चढलेले माकड लगेच खाली पडले. सर्वाना फार वेदना झाल्या. पन त्यांना कळेना की पाणी कोठून पडले. शास्त्रज्ञांनी अशी रचना केली होती की ज्यावेळी कोणीही त्या शिडीवर चढेल अणि केळी घेण्याचा प्रयत्न करेल त्याच वेळी त्या सर्वांच्या अंगावर गरम पाणी पडेल.
- सर्व माकडांनी फार शोधा शोध केली परंतु त्यांना काही उत्तर मिळाले नाही. शेवटी ते नाराज झाले आणि शोध मोहीम थांबली तेवढ्यात त्यांच्यातील एका माकडाची नजर त्या केळी कडे गेली आणि ती घेण्यासाठी तो शिडी वर चढला तोच त्यांच्या अंगावर गरम पाण्याचा वर्षाव झाला. अजून एकदा त्यांची त्वचा भाजून गेली. ते केळी घेणाारे माकड ही खाली पडले.
- काही वेळा नंतर त्यांना थोडे बरे वाटले. पण आणखी एकाला मोह आवरला नाही आणि तो त्या शिडी वर चढला तोच त्यांच्या अंगावर गरम पाण्याचा वर्षाव झाला. आता मात्र त्यांचा संशय आला की आपल्या अंगावर गरम पाणी पडण्याचे कारण म्हणजे ते पाणी आहे. सर्वानी ठरवले की आता कोणीही तिकडे जाणार नाही.
- सर्वजण रात्री झोपी गेले. सकाळी उठून अन्नाच्या शोधात लागले. परंतु कोणीही त्या केळी कडे गेला नाही. शेवटी न राहवून एका माकडाने मजल मारली आणि तो शिडी वर चढला. त्याच वेळी अजून एकदा गरम पाणी पडले. मग सर्वानी त्या माकडाला फार मारले आणि आता तिकडे कोणीही जाणार नाही याची काळजी घ्यावी म्हणुन त्यांनी 5 माकडांना त्याची राखण करीत बसायला सांगितले बाकीच्या माकडांनी त्यांच्या साठी जेवण आणावे असे नियम लागु केले. व सर्वांचा नंबर क्रमाक्रमाने येईल अशी व्यवस्था केली.
- मग
- त्या शिडी कडे कोणीही जात नव्हते.
- असेच 2 दिवस गेले कोणीही त्या शिडी कडे गेले नाही.
- त्यानंतर शास्त्रज्ञांनी त्या १० माकडा मधून १ माकड काढले आणि त्याला दूरच्या जंगलात जाऊन टाकले व त्याठिकाणी गार्डन मधल्या एका नवीन माकडाला प्रयोग शाळेत आणले. त्या नवीन माकडाची नजर केळी कडे जाताच ते शिडी वर चढू लागले परंतु त्या आधीच बाकीच्या जुन्या माकडांनी त्याला भरपूर मारला. मग ते जुने माकड त्या केळी कडे गेला नाही.
- तो दिवस असाच गेला.
- दुसर्या दिवशी सकाळी शास्त्रज्ञांनी आणखी एका जुन्या माकडाला प्रयोग शाळेतून काढून दूरच्या जंगलात जाऊन टाकले आणि गार्डन मधील एका नव्या माकडाला प्रयोग शाळेत आणले. त्याही माकडाची नजर त्या केळी कडे गेली आणि तोही त्या शिडी वर चढला तोच त्यालाही मार खावा लागला पन विशेष म्हणजे त्याला मारायला अगोदरच जुने माकड सुद्धा सामील झाले होते. नंतर त्या नव्या माकडाने त्या शिडी कडे जाण्याचा मोह टाळला. तो ही दिवस असाच गेला.
- नंतरच्या दिवशी ही शास्त्रज्ञांनी तिसर्या एका जुन्या माकडाला प्रयोग शाळेतून काढून टाकले आणि गार्डन मधील एका नव्या माकडाला प्रयोग शाळेत आणले. त्याचीही नजर त्या केळी कडे गेली आणि तोही त्या शिडी कडे जाण्याचा मोह आवरू शकला नाही आणि त्यालाही जबरदस्त मार खावा लागला. मग तोही दिवस असाच गेला.
- नंतरचे काही दिवस असेच जावू लागले. शास्त्रज्ञा रोज एक जुने माकड प्रयोग शाळेतून काढून टाकी आणि त्या ठिकाणी एका नवीन गार्डन मधल्या माकडाची भारति होई. ते नवीन माकड केळी कडे जाताच त्याला इतर माकडांचा मार खावा लागायचा अणि आज मार खाल्लेले माकड उद्याचा नवीन येणार्या माकडाला मारण्यात सामील होत.
- ......
- काही दिवसानी त्या प्रयोग शाळेत एकही जुने माकड राहिले नव्हते की ज्याला शिडी वर न जाण्याचे कारण माहीत होते. आता प्रयोग शाळेत फक्त नवीन माकडे राहिली होती. तरीही ती नवीन माकडे त्या शिडी वर कोणालाही जाऊ देत नव्हती. विशेष म्हणजे शास्त्रज्ञांनीही ४ दिवसानंतर पाणी खाली पाडण्याचे बंद केले होते आणि आजचा ४० वा दिवस होता. त्यातल्या कोणालाही माहीत नव्हते की त्या शिडी वर का चढायचे नाही. तरीही ते कोणालाही वर चढू देत नव्हते.
- मलाही हेच सांगायचे आहे की आपल्या समाजात अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपले पूर्वज मानत आले आहेत त्या आपण ही मानतो. परंतु त्यातल्या काही गोष्टी आपल्या साठी चांगल्या आहेत व काही गोष्टी स्पष्ट पणे चुकीच्या आहेत की ज्या मागचे कारण आपल्याला माहीत नसते तरीही आपण त्या मानत आहोत. त्याचे बेस्ट उदाहरण आहे ते म्हणजे आंध श्रद्धा. आपण बर्याच गोष्टी करतो की ज्याचे कारण आपल्याला माहीत नसते. तरीही त्या आपण करतोच. म्हणुन डोळे उघडून बघा.
- दुसरे उदाहरण म्हणजे एखादा व्यक्ति आपल्या बद्दल चुकीची माहिती अशा व्यक्तीला देतो की ज्याला आपण आदर देतो. पन ज्यावेळी ती व्यक्ति आपल्याबद्दल चुकीचे ऐकते त्या दिवसापासून तो माणूस सुद्धा आपल्या संशय घेतो. आणि आपल्याला ज्यावेळेस कळते की आपली लबाडी केली आहे आणि ती ही आपल्याच माणसाने मग आपण त्यांच्या पासून दूर जायला लागतो आणि एकमेकांत खुन्नस वाढीस लागतो. आपण त्याला का बोलत नाही ह्याचे कारण की आपण विसरून जातो आणि उगीच एखाद्या शुल्लक गोष्टीवरून ही आपल्यात तणाव निर्माण होतो. आणि वैर वाढत जाते. एक दिवस असा येतो की दोघांनाही ना बोलायाचे कारण माहीत बसते तरीही ते एकमेकांना बोलत नाहीत.
- अशा बर्याच गोष्टी आहेत की ज्यांच उदाहरण वरील माकडांच्या गोष्टीशी जुळते.
